Welcome to Souq Ecommerce Store !
शैक्षणिक वर्ष आणि अॅडमिशन्सचं काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

नव्या शैक्षणिक वर्षाचं काय, प्रवेश होणार कसे याची उत्तर आणि यासंबंधीचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केला. शाळा सुरू झाल्या नाहीत. तरीही शिक्षण सुरूच राहील, असं ठाकरे म्हणाले.
मुंबई, 18 मे :  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Coronavirus) अद्याप कमी झालेला नाही. यानंतरच्या काळातही कोरोनाबरोबरच जगावं लागणार आहे. याचा  शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्यावर नव्या शैक्षणिक वर्षाचं काय, प्रवेश होणार कसे याची उत्तर आणि यासंबंधीचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केला.
Covid-19 च्या साथीमुळे जागतिक स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात बदल होऊ शकतात. कुठल्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष वाया घालवता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आपल्याकडेही नियमित शैक्षणिक वर्ष सुरु होईल अशा रीतीने शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

शाळा सुरू झाल्या नाहीत. तरीही शिक्षण सुरूच राहील. शैक्षणिक वर्षं वाया जाऊ देणार नाही, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या चर्चेतून नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागांसाठी व्हर्च्युअल क्लासरूम्स, ई-लर्निंग, डिजिटल पर्यांयाचा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सामावून घेणारी प्रणाली विकसित करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतर आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी शालेय शिक्षण तसेच उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी Video Conferencing च्या माध्यमातून आढावा घेतला. या बैठकीत मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आणि इतर वरीष्ठ अधिकारी सहभागी झाले.
ठाकरे म्हणाले की, शाळा सुरू होणार नाहीत. पण शिक्षण सुरूच राहील, असं नियोजन करणं आवश्यक आहे.

विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चार भिंतीतील शाळा सुरू शकली नाही, तर ऑनलाईन-शिक्षण, डिजिटल माध्यमाच्या पर्यांयाच विचार करावाच लागेल. विशेषतः कंटेन्मेंट झोनमधील शाळा बंद राहतील. ग्रीन झोनमध्ये शाळा सुरू करता येतील. पण झोनची परिस्थिती बदलली तर अडचणी निर्माण होतील. महापालिका क्षेत्रांमध्ये ग्रीन झोन कमी आहेत. त्यामुळे हा मोठा प्रश्न आहे. शहरात इंटरनेट सेवा उपलब्ध असते. त्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन, व्हर्च्युअल क्लासरूम्स पर्याय वापरता येईल. ग्रामीण भागात ग्रीन झोन जास्त आहेत. पण त्याठिकाणी वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध करावी लागेल, असंही त्यांनी सांगितले.
"राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाईन, ई-लर्निंग, डिजिटल क्लास या माध्यमातून सामावून घेणारी प्रणाली विकसित करावी लागेल. त्यासाठी शिक्षण आणि तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून राज्यातील शाळांतील आराखडा तयार करण्यात यावा. यासाठी जगातील अन्य ठिकाणच्या परिस्थितीची माहिती घेण्यात यावी, अभ्यास करून आराखडा तयार करण्यात यावा", असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

 शैक्षणिक निर्णय
  • राज्यात 750 शाळांत व्हर्च्युअल शिक्षण सुरू
  • अंतिम वर्ष वगळून अन्य वर्षातील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात दाखल करणार
  • प्रथम वर्ष प्रवेशाच्या नियोजनाची तयारी
  •  सीईटी आणि अन्य परीक्षांसाठीही तयारी करण्यात येत आहे.
  • बालभारतीची पाठ्यपुस्तके पीडीएफ (.pdf) स्वरूपात उपलब्ध करण्यात आली आहेत.
  • ही डिजिटलं पुस्तकं 67 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आली आहेत.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवल्यानंतर जनतेशी संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना ठाकरे यांनी मान्सून सुरू होण्यापूर्वी हे संकट संपवायचंच, असा निर्धार व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या संवादातले महत्त्वाचे मुद्दे
  • कोरोनानंतर जग बदलेल. कोरोनाबरोबर जगायची तयारी ठेवा.
  • घरात राहा, सुरक्षित राहा. घराबाहेर जाताना सावध राहा.
  • जनजीवळ रुळावर आणायचं आहे. पण त्यासाठी काही काळ आणखी जावा लागणार.
  • कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होऊ, तितक्या लवकर आपण बंधनमुक्त होऊ.
  • ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आणखी काही निर्बंध शिथिल होणार.
  • क्षेत्रातल्या रेड झोन क्षेत्रांतल्या निर्बंधांमध्ये फारशी शिथिलता आणता येणार नाही.
  • धार्मिक सण, धार्मिक जमावांना परवानगी देता येणार नाही.
  • शाळा कशा सुरू करायच्या, परीक्षा, अॅडमिशन्स कशा घ्यायच्या यावर विचार सुरू.
  • महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या गावी जायची घाई करू नका.

Whatsapp group link

Clothing & Apparel:

Jewelry & Watches:

Health & Beauty: