शैक्षणिक वर्ष आणि अॅडमिशन्सचं काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर
- राज्यात 750 शाळांत व्हर्च्युअल शिक्षण सुरू
- अंतिम वर्ष वगळून अन्य वर्षातील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात दाखल करणार
- प्रथम वर्ष प्रवेशाच्या नियोजनाची तयारी
- सीईटी आणि अन्य परीक्षांसाठीही तयारी करण्यात येत आहे.
- बालभारतीची पाठ्यपुस्तके पीडीएफ (.pdf) स्वरूपात उपलब्ध करण्यात आली आहेत.
- ही डिजिटलं पुस्तकं 67 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आली आहेत.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवल्यानंतर जनतेशी संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना ठाकरे यांनी मान्सून सुरू होण्यापूर्वी हे संकट संपवायचंच, असा निर्धार व्यक्त केला.
- कोरोनानंतर जग बदलेल. कोरोनाबरोबर जगायची तयारी ठेवा.
- घरात राहा, सुरक्षित राहा. घराबाहेर जाताना सावध राहा.
- जनजीवळ रुळावर आणायचं आहे. पण त्यासाठी काही काळ आणखी जावा लागणार.
- कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होऊ, तितक्या लवकर आपण बंधनमुक्त होऊ.
- ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आणखी काही निर्बंध शिथिल होणार.
- क्षेत्रातल्या रेड झोन क्षेत्रांतल्या निर्बंधांमध्ये फारशी शिथिलता आणता येणार नाही.
- धार्मिक सण, धार्मिक जमावांना परवानगी देता येणार नाही.
- शाळा कशा सुरू करायच्या, परीक्षा, अॅडमिशन्स कशा घ्यायच्या यावर विचार सुरू.
- महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या गावी जायची घाई करू नका.











