Maharastra : माझा महाराष्ट्र वृत्तसेवा
कोरोनाचा सामूहिक संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे राजधानी दिल्लीत यूपीएससी परिक्षेची तयारी करणारे शेकडो मराठी विद्यार्थी अडकून पडले होते. महाराष्ट्र तसेच दिल्ली सरकारच्या समन्वयाने या विद्यार्थ्यांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा झाला. शनिवारी रात्री आठ वाजता जुनी दिल्ली स्टेशनवरून विशेष रेल्वेने तब्बल १४०० विद्यार्थी स्वगृही परतण्यासाठी रवाना झाले. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी त्यामुळे मोठी गर्दी केली होती. विशेष डीटीडीसीच्या बसेसने सर्वांना आणण्याचा व्यवस्था सरकारकडून करण्यात आली होती. उराशी कोरोनाची भीती असली तरी प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर घरी परतण्याचा आनंद ओसंडून वाहत होता.
विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात परतण्याचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकारने केला आहे. शनिवारी स्क्रिनिंगसाठी नियोजित केंद्रावर पोहोचण्यासाठी करोलबाग मेट्रो स्टेशन येथे बसची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकाळी नऊ वाजल्यापासून गर्दी केली होती. बसमधून एकावेळी १६ विद्यार्थ्यांना स्क्रिनिंग केंद्रावर सोडण्यात येत होते. डॉ. आंबेडकर स्टेडियम, साकेत आणि गोल मार्केट येथे ही या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय पडताळणीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, इतर राज्यातील विद्यार्थ्यांचे स्क्रिनिंग सुरू असल्याने या विद्यार्थ्यांना दुपारपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. दुपारी दोन वाजता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे सुरू झालेले स्क्रिनिंग पाच वाजेपर्यंत संपले. त्यानंतर विद्यार्थ्यांना बसने टप्प्याटप्प्याने जुनी दिल्ली रेल्वे स्थानकावर सोडण्यात आले.

स्वगृही परतणा-या सर्व विद्यार्थ्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. लक्षणे आढळणा-य विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
आरोग्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे घरी परत जात असल्याचा आनंद आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग होण्याची भीतीही वाटते. कारण, भुसावळवरून नागपूरचा प्रवास बसने करावा लागणार आहे. आज संपूर्ण दिवस स्क्रिनिंगमध्ये गेला आहे आणि उद्याचा संपूर्ण दिवस प्रवासात जाणार आहे. त्यामुळे सुखरुप घरी पोहोचण्याचीच अपेक्षा आहे, अशी भावना एका विद्यार्थ्याने व्यक्त केली.
कुटुंबासोबत असल्यावर कोणत्याही संकटाचा सामना करणे शक्य आहे. त्यामुळे आता पुण्यात जाऊन यूपीएससीची तयारी करणार आहे. लॉकडाऊनमुळे दिल्लीत राहणे कठीण झाले होते. त्यामुळे घरी जात असल्याचा नक्कीच आनंद वाटतो, अशी भावना नरेंद्र हर्षे याने बोलून दाखवली.
दिल्लीची आठवण येईल!
गेल्या वर्षीपासून दिल्लीत यूपीएससीची तयारी करत आहे. सर्वांशी मैत्री झाली होती. मात्र, अनिश्चिततेमुळे घरी परतावे लागत आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पुन्हा दिल्लीत येऊन स्थिरावण्यास वेळ जाईल. घरी जात असल्याचा आनंद असला तरी दिल्लीची आठवण मनात कायम राहील, असे आकाश जगताप याने सांगितले.
प्रयत्नांना अखेर यश
शनिवारी सकाळी ११ वाजता दिल्लीतील डॉ. आंबेडकर स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले. काही विद्यार्थ्यांना यादरम्यान थोडाफार उन्हाचा त्रास झाला. पंरतु, प्रशासनाकडून सर्वांना बिस्किट तसेच पाण्याची बॉटल देण्यात आली. स्टेडियममध्ये जवळपास ७०० विद्यार्थ्यांची वैद्यकीय पडताळणी करण्यात आली, अशी माहिती आकाश भामरे या विद्यार्थ्याने दै. ‘पुढारी’ सोबत बोलताना दिली. विशेष ट्रेन दिल्ली-भुसावळ-नाशिक-कल्याण-पुणे अशी धावणार आहे. एप्रिल महिन्यापासून घरी परतण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रयत्न केले जात आहे. प्रयत्नांना आता यश मिळाले आहे. राजधानीतील परिवहन व्यवस्था, तसेच युपीएससी चे क्लासेस जोपर्यंत सुरु होत नाही तोपर्यंत परतणार नाही, अशी भावना त्याने बोलून दाखवली.
संपादक- ईश्वर पाटील
Whatsapp group link
⬇️⬇️⬇️⬇️⬇️