Welcome to Souq Ecommerce Store !
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाची ‘डबल सेंच्युरी’ पूर्ण, तर आजपर्यंत १२५ रूग्ण ‘कोरोनामुक्त
पिंपरी १७ मे, माझा  महाराष्ट्र वृतसेवा:- 
                               पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात आज (दि.१७) दिवसभरात ०९ ‘पॉझिटिव्ह’ रूग्ण आढळले असून आजअखेरच्या बाधितांची संख्या २०४ वर पोहचली आहे.  दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे आज ६ रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आजपर्यंत १२५ रूग्ण ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत. 
       पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकानुसार आज दिवसभरात कोरोनाचे ९ रुग्ण आढळले आहेत. काल शनिवारी सुद्धा ९ जणांना कोरोनाची लागण झाली होती. आज रविवारी कोरोनाची लागण झालेले रुग्ण हे दिघी, किवळे-विकासनगर, चिंचवड-आनंदनगर, चिखली-मोरेवस्ती, चिंचवड-संभाजीनगर आणि पिंपळेगुरव या भागातील आहेत. दोन दिवसांत १८ जणांना कोरोना झाल्याने पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २०४ झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील कोरोना रुग्णांच्या संख्येने दोनशेचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे आज ६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये सध्या ६४ कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे पिंपरी चिंचवडमधील चौघांचा बळी गेला आहे. तसेच १२५ रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत. 

Whatsapp group link
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

Clothing & Apparel:

Jewelry & Watches:

Health & Beauty: