कोरोनामुळे देशात लॉकडाउन घोषित झाला आणि त्यामुळे अनेक राज्यातील दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांसह सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा पण रद्द केल्या जाण्याची शक्यता होती. मात्र आता केंद्राने या परीक्षा घेण्यास सशर्त परवानगी दिली आहे. अनेक राज्यांच्या मागणीनंतर केंद्राने दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे.
दरम्यान, परीक्षा होणार असली तरी ती कंटेंमेंट झोनमध्ये घेतली जाणार नाही. तसंच सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून परीक्षा घेतली जाणार आहे. त्याचबरोबर शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मास्क घालणं बंधनकारक असेल. तसंच विद्यार्थ्यांची थर्मल चाचणी करण्यात यावी. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश केंद्राने दिले आहेत.