
मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत केंद्र सरकारने आता लॉकडाऊन ५ ची घोषणा केली आहे. लॉकडाऊनचा कालावधी आता आणखी महिन्याभरासाठी वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन ४ हा ३१ मे पर्यंत होता. आता त्यापूर्वी केंद्र सरकारने लॉकडाऊन ५ ची घोषणा केली आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन परिस्थितीचा आढावा आणि सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांच्यात बैठक पार पडली आणि लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या लॉकडाऊनमध्ये कंटेन्मेंट झोन वगळता इतर झोनमध्ये काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहेत.
महत्वाचे मुद्दे
केंद्र सरकारकडून लॉकडाऊन ५ची घोषणा
संपूर्ण देशभरात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर
कन्टेंन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत निर्बंध कायम
रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू राहणार
राज्यांसोबत चर्चा केल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत जुलैमध्ये निर्णय घेण्यात येणार
८ जून नंतर अटींसह धार्मिक स्थळांना खुल करण्याची परवानगी, मात्र, सोशल डिस्टंसिंग आणि इतर नियमांचे पालन करावे लागणार
८ जून नंतर अटींसह हॉटेल्स सुरू करण्याची मुभा, हॉटेलमध्ये एकावेळेस किती व्यक्तींना प्रवेश याबाबतची माहिती लवकरच उपलब्ध करण्यात येईल
मेट्रो सेवा, सिनेमागृह, जीमला तूर्तास बंदी कायम
राजकीय, सामाजिक कार्यक्रमास तूर्तास निर्बंध
चेहऱ्यावर मास्क लावणे आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य
Movement of individuals shall remain strictly prohibited between 9 pm to 5 am throughout the country, except for essential activities: Ministry of Home Affairs. #UNLOCK1
Lockdown to continue in Containment zones till June 30, only essential activities allowed: MHA #UNLOCK1
Lockdown to continue in Containment zones till June 30, only essential activities allowed: MHA #UNLOCK1
शाळा-कॉलेज बाबत काय निर्णय?
शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्र, कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेण्यात येईल. जुलै महिन्यात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा करुन आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल.
आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो सेवा, सिनेमागृह, जिम, स्विमिंग पूल, इंटरटेन्मेंट पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम यावर निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
Join whatsapp group for daily updates
👇👇👇