Welcome to Souq Ecommerce Store !
वाचा | का आहे लॉकडाऊनमध्ये वेस्टन एक्सप्रेसवर हायवेवर ट्राफीक ...
                           माझा महाराष्ट्र वृत्तसेवा
मुंबई: अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावर आल्याने वेस्टर्न एक्सप्रेस वेवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असून वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू होऊन एकच दिवस झाला आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची प्रवासाची सूट देण्यात आलेली नाही. असं असतानाही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर नेहमीप्रमाणे जशी वाहतूक कोंडी होते, तशीच वाहतूक कोंडी आज पाह्यला मिळाली. कांदिवली, मालाड, जोगेश्वरीमधील अनेक लोक खासगी वाहने घेऊन मुंबईला जाण्यासाठी घराबाहेर पडल्याने कांदिवलीपासून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी झाली आहे.  प्रत्येक जण वेगवेगळ्या बहाण्याने घराबाहेर पडल्याने सकाळी सकाळीच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वाहतूक कोंडीमुळे जॅम झाला आहे. लॉकडाऊनपूर्वी या एक्सप्रेस हायवेवर ज्या प्रकारची कोंडी असते तशीच कोंडी आज या ठिकाणी पाह्यला मिळत आहेत. लॉकडाऊनमध्ये कोणतीही शिथिलता दिलेली नसतानाही मुंबईकर आज अचानक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. कांदिवलीहून मुंबईकडे खासगी वाहनाने निघालेल्या या मुंबईकरांमुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे.  वाहने घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांपैकी अनेकजण अत्यावश्यक सेवेतील कामगार आहेत. काही लोकांकडे पासही आहेत. तर काही लोक केवळ नातेवाईकांना भेटण्यासाठी मुंबईकडे निघाले आहेत. काहींना एसी दुरुस्त करण्याचे काम करायचे आहे, तर काहींना डायमंड मार्केटमध्ये जाऊन कामगारांना पगार वाटप करायचा आहे. तर काहींना औषधे आणण्यासाठी मुंबईला जायचे आहेत.  अंधेरी ते बोरिवली दरम्यान नाकाबंदी नसल्याने अनेकांचं फावलं असून त्यामुळेही ही वाहतूक कोंडी झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मुंबईत अनेक ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार केले आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईच्या अनेक भागात जाण्यास आणि या भागातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. WebTittle ::  Read | Why is there traffic on the highway on the Weston Express in lockdown    


Join whatsapp group
        ⬇️⬇️⬇️⬇️
         click here

Clothing & Apparel:

Jewelry & Watches:

Health & Beauty: