Welcome to Souq Ecommerce Store !
दहावी आणि बारावी निकालाबाबत शिक्षण मत्र्यानी केला ' हा' खुलासा



                          
 माझा महाराष्ट्र वृत्तसेवा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता संसर्गामुळे दहावी आणि बारावी या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीमध्ये अनेक अडचणी येत आहेत. परिणामी यंदा निकाल उशीरा लागण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागेल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी सांगितले. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पालकांना आणि मुलांना दहावी व बारावीचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा आहे. या निकालानंतर सोशल मीडियावर उलट-सुलट माहिती नागरिकांपर्यंत पोहचवली जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मात्र, शालेय शिक्षण मंत्र्यांनी निकालाबाबत खुलासा केल्यामुळे निकालाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले की, साधारणत: दरवर्षी दहावीचा निकाल 10 जूनपर्य़ंत लागतो. तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागतो. मात्र यंदा उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण होऊन निकाल लावण्यासाठी आणखी किमान दीड ते दोन महिने लागण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच लॉकडाऊनमुळे दहावी आणि बारावीच्या निकालाला थोडा उशिर होणार आहे.

परंतु नागरिकांना सध्या निकालाच्या तारखांबाबत पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. निकालाबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने अधिकृतरित्या माहिती देण्यात येईल असे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले.

    Join whatsapp group for daily updates



                             click here

Clothing & Apparel:

Jewelry & Watches:

Health & Beauty: