
करोनाच्या पार्श्वभमीवर राज्यात ३१ मार्चपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि ३ मे रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून करण्यात येत होती. याची दखल घेऊन आयोगाने या दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घोषित केला आहे.
Join whatsapp group for daily updates