Welcome to Souq Ecommerce Store !
CoronaVirus News: मोठी बातमी!... शाळा उघडण्याचा मुहूर्त ठरला; मोदी सरकारने 'मास्टर प्लॅन'च आखला
CoronaVirus : दुसरीकडे आठवीपर्यंतच्या मुलांना घरातूनच अभ्यास करावा लागणार आहे. कारण ते पूर्णतः स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. 
 
CoronaVirus News: मोठी बातमी!... शाळा उघडण्याचा मुहूर्त ठरला; मोदी सरकारने 'मास्टर प्लॅन'च आखला

नवी दिल्लीः केंद्र सरकार झोननुसार पुन्हा शाळा पुन्हा उघडण्याच्या विचारात आहे. पहिल्यांदा ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये शाळा उघडण्यात याव्यात, असा सरकारचा मानस आहे. पहिल्यांदा मोठ्या वर्गातील मुलांना शाळेत बोलवण्यात येणार आहे. दुसरीकडे आठवीपर्यंतच्या मुलांना घरातूनच अभ्यास करावा लागणार आहे. कारण ते पूर्णतः स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. 

शाळा उघडण्यासाठी अधिकृतरीत्या नियमावली या आठवड्याच्या अखेरपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. सर्वच मंत्रालयांच्या सहमती मिळाल्यानंतर याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. देशातील सर्वच शाळा १६ मार्चपासून बंद करण्यात आल्या आहेत. तेव्हापासून आतापर्यंत मध्ये दोन महिन्यांचा कालावधी लोटला. त्यामुळे शाळा आता कधी उघडणार याचीच सगळ्यांना काळजी लागून राहिली आहे. 

३० टक्के उपस्थितीनं उघडणार शाळा
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, शाळांना जुलैमध्ये उघडण्यात येणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग लक्षात घेता ३० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षित करण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी शाळा उघडणार असल्याचे संकेत दिले आहेत. पण त्यासाठी शाळा आणि कॉलेजमध्ये आधी सुरक्षेचे उपाय राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

यूजीसी आणि एनसीआरटी मिळून तयार करत आहेत मार्गदर्शक सूचना
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री म्हणाले की, यूजीसी आणि एनसीआरटी मिळून मार्गदर्शन सूचना तयार करत आहेत. शाळा, महाविद्यालय आणि युनिव्हर्सिटीजसाठी ही मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जाऊ शकतात. शाळांमध्ये थर्मल स्कॅनर ठेवण्यात येणार असून, वर्गातील आसनव्यवस्थेतही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात येणार आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून मुलांच्या 2हालचालींवर नजर ठेवण्याचीही योजना आहे. 



            Join whatsapp group for daily updates

                                            click here

Clothing & Apparel:

Jewelry & Watches:

Health & Beauty: