2. आजपासून शाळा सुरु होणार नाहीत, मात्र ऑनलाईन शिक्षण सुरु, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट आमदार कपिल पाटील यांची माहिती, शिक्षक वर्क फ्रॉम होम करणार
3. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी केलं जात नसल्याची काँग्रेस नेत्यांची नाराजी कायम, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
4. राज्यात काल दिवसभरात 3390 नवे रुग्ण, कोरोना बाधितांचा आकडा 1 लाख 7 हजार पार, तर राज्यात सध्या 53 हजार 17 रुग्णांवर उपचार सुरु
5. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं आतापर्यंत राज्यातील 11 हजार कैद्यांना जामीन, जेलमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि बिघडलेली अवस्था सावरण्यास मदत होणार
6. जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 80 लाखांच्या उंबरठ्यावर; तर 4 लाख 357 हजार 177 लोकांचा मृत्यू, आतापर्यंत 41 लाख 04 हजार 373 लोक कोरोनामुक्त
7. मान्सूननं अख्खा महाराष्ट्र व्यापला; धुळे, सिंधुदुर्ग, परभणी आणि नगरमध्ये मुसळधार, धुळ्यात घरांमध्ये पाणी, पेरणीच्या कामांसाठी लगबग सुरु
8. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट, सुशांतच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार
9. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 ची सुरुवात, आज 12 प्रमुख सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या, कराराद्वारे परदेशातील आणि भारतातील मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक करण्यास
सहमती
10. नागपूर जिल्ह्यात 12 तासांत दोघांची हत्या, महिलेशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हत्याकांड झाल्याचे उघड, हत्या केल्यानंतर आरोपींकडूनच फोन करुन पोलिसांना माहिती