Welcome to Souq Ecommerce Store !
स्मार्ट बुलेटिन | 9 जून 2020 | मंगळवार | माझा महाराष्ट्र वूत्तसेवा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. शरद पवार आज आणि उद्या कोकण दौऱ्यावर, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार

2. राज्यात काल दिवसभरात 2553 नव्या कोरोना बाधितांची भर, एकाच दिवसात राज्यात 109 रुग्णांचा मृत्यू, तर मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 50 हजारांच्या पार

3. सौम्य लक्षणं असलेल्या कोरोनाग्रस्तांवर आता घरीच उपचार होणार, राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचे आदेश, बेड्सची कमतरता आणि वाढता खर्च लक्षात घेता निर्णय

4. वांद्रे टर्मिनसवर सोनू सूदला परवानगी नाकारली, प्लॅटफॉर्मवर जाण्यासही मज्जाव, मुजूरांना न भेटताच सोनू घरी परतला

5. वारकऱ्यांमध्ये अजित पवार दुजाभाव करतात, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, वारीची परवानगी देताना विदर्भाला डावलल्याची टिका

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 09 जून 2020 | मंगळवार | ABP Majha



6. कर्मचाऱ्यांचे पगार कसे द्यायचे? सरकार समोर प्रश्न; मात्र प्रसंगी कर्ज काढू; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती.

7. येत्या 48 तासांमध्ये महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज, तर बळीराजा मान्सूनच्या प्रतिक्षेत

8. महाराष्ट्रात सरकारच्या नावावर महाविकास आघाडीची सर्कस, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहांची टिका, कोरोनाला रोखण्यास सरकार अपयशी ठरल्याचाही ठपका

9. पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार नीरव मोदीला मोठा झटका, 1400 कोटींची मालमत्ता होणार जप्त

10. जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 72 लाखांवर, गेल्या 24 तासांत एक लाख नवे रुग्ण; आतापर्यंत 35 लाख रुग्ण कोरोनामुक्त
Join whatsapp group

Clothing & Apparel:

Jewelry & Watches:

Health & Beauty: