गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय सैन्यात झालेल्या चकमकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं जाणार नाही. आमच्यासाठी देशाची अखंडता आणि सार्वभौमत्व महत्त्वाचं आहे. आम्हाला शांती हवी आहे पण भारताकडे चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता आहे. असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
I would like to assure the nation that the sacrifice of our jawans will not be in vain. For us, the unity and sovereignty of the country is the most important...India wants peace but it is capable to give a befitting reply if instigated: PM Narendra Modi #IndiaChinaFaceOff
चीन सीमेवर भारतीय जवान प्रतिकार करताना मारले गेले आहेत. या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारत हा शांतताप्रिय देश आहे. पण जशास तसे उत्तर देण्यासही भारत सक्षम आहे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत आयोजित ऑनलाईन बैठकीच्या सुरुवातीला मोदी बोलत होते.
"भारताने नेहमीच शेजारी देशांसोबत सहकार्याची भावना ठेवली आहे. आपण कधीच कुणाला उचकवत नाही. पण वेळ आल्यानंतर त्यांना धडा शिकवतो.
वेळ आल्यानंतर आपण आपलं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. त्याग आणि बलिदानासोबतच शौर्य आणि धाडसही दाखवता येतं. आम्हाला शांती हवी आहे. पण जशास तसे उत्तर देण्यासही भारत सक्षम आहे," असं मोदी म्हणाले.
याआधी भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीटच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारला 5 प्रश्न विचारले होते.
"पंतप्रधान गप्प का आहेत?
ते समोर का येत नाहीत?
झालं ते खूप झालं. भारत-चीन सीमेवर नेमकं काय घडलं हे आम्हाला कळायलाच हवं.
आपल्या सैनिकांवर हल्ला करण्याचं धाडस चीन कसं करतं?
ते आपली जमीन कशी बळकावू शकतात?"
अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Why is the PM silent?
Why is he hiding?
Enough is enough. We need to know what has happened.
How dare China kill our soldiers?
How dare they take our land?
गलवान व्हॅली भागात भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये चकमक झाली. या चकमकीतला आधी भारताचे तीन जवान मृत्युमुखी झाल्याचं सांगण्यात आलं होतं.
पण या चकमकीत किमान 20 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. ही गेल्या 45 वर्षांतील सर्वांत मोठी चकमक असल्याचं म्हटलं जात आहे.
लष्कराने सांगितलं आहे की या चकमकीत 17 सैनिक गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांचा मृत्यू झाला आहे. याआधी तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं लष्कराने सांगितलं होतं.
दरम्यान या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी 19 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता सर्वपक्षिय बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक ऑनलाईन होणार आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली आहे. देश तुमच्याबरोबर आहे पण सत्य सांगा असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.
चीन के मुंहजोरी को कब मिलेगा करारा जबाब?बिना गोली चले हमारे 20 जवान शहीद होते है.हमने क्या किया?
चिनके कितने जवान मारे गये? चीन हमारे जमीन पर घुस गया है क्या?प्रधान मंत्रीजी इस संघर्ष के घडीमे देश आपके साथ है लेकीन सच क्या है?
बोलो.कुछ तो बोलो. देश सच जानना चाहता है.
जय हिंद!
राऊत म्हणातात,
"पंतप्रधानजी तुम्ही शूर योद्धे आहात. तुमच्या नेतृत्वात भारत चीनचा बदला घेईल.
चीनच्या घुसखोरीला केव्हा प्रत्युत्तर देणार? गोळीबार न होता भारताचे 20 जवान शहीद होतात. आपण काय केलं?
चीनचे किती जवान मारण्यात आले? चीनने आपली जमीन बळकावली आहे का? पंतप्रधानजी, या अवघड काळात देश तुमच्याबरोबर आहे. पण सत्य काय आहे?
बोला, काहीतरी बोला. देशाला सत्य जाणून घ्यायचं आहे."
तसंच "सीमेवर जे काही घडलं त्याकरता आपण जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राहुल गांधी यांना जबाबदार धरू शकत नाही. वीस जवानांनी देशासाठी जीव समर्पित केला. ते आपल्यासाठी लढले. पंतप्रधान जो निर्णय घेतील तो सर्वपक्षांना मान्य असेल पंतप्रधानांनी नक्की काय चुकलं हे जनतेला सांगायला हवं," असं राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे.
संरक्षण मंत्र्यांची प्रतक्रिया
"भारत-चीन सीमेनजीक गलवान भागात भारतीय सैनिकांना जीव गमवावा लागणं हे अत्यंत वेदनादायी आणि अस्वस्थ करणारं आहे. आपल्या जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत देशाप्रती कर्तव्य बजावलं. देशासाठी लढताना त्यांनी भारतीय लष्कराची परंपरा कायम राखताना जीव समर्पित केला," असं केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीनंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे.
Join WhatsApp group