नाशिक : (बोधले नगर) येथील वडीलांच्या पाठिंब्यामुळे उपमुख्यकार्यकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न पुर्ण त्याने पूर्ण केले. नोकरी करत असतानाच स्पर्धा परिक्षेचा अभ्यासाला सुरूवात केली अन् ईच्छा शक्तीच्या जोरावर इंथपर्यंतचा प्रवास पुर्णत्वास आला असून 'वडीलांची साथ' यामुळेच हे साध्य झाल्याचे सुहासने 'सकाळ'शी बोलतांना सांगितले.
ईच्छा शक्तीच्या जोरावर इथंपर्यंतचा प्रवास
सुहास मारूतीराव वाकचौरे यांनी वडीलांच्या मार्गदर्शनामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण केले आहे. सुहास वाकचौरे यांनी 2004 साली पुणे येथे केमिकल अभियंता ही पदवी प्राप्त केली होती.
> MPSC RESULT : नाशिकच्या उमेदवारांचा "एमपीएससी'त विविध पदांवर डंका!
माझ्या यशात सकाळचे मोठे योगदान
नियमितपणे अठरावर्षांपासून सकाळ वृत्तपञाचे वाचन करून त्यातील संपादकीय लेख व आंतराष्ट्रीय घडामोडींचे वर अभ्यास करत असे. तसेच युवारंग व सप्तरंग पुरवणीतील लेख व सामान्यज्ञान यांचा अभ्यास व वाचन करून प्रेरणा मिळाली.
मनाची तयारी व जिद्द उराशी बाळगून अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण केले आहे. दहा वर्षांत अनेक पद प्राप्त करून देखील वर्ग 1 अधिकारी होण्यासाठीची धडपड चालू होती. परिक्षेच्या वेळी कुठलाही वेळ वाया जाऊ न देता सदुपयोग केला. - सुहास वाकचौरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी
> निर्दयीपणाचा कळस! तीन दिवसाचे बाळ टाकले शेतात...अन् मग..








