Welcome to Souq Ecommerce Store !
चाकण येथील कंपनीत सात जण करोना बाधित
राजगुरूनगर (प्रतिनिधी) : चाकण येथील एकाच कंपनीत सात जण करोना पॉझिटिव्ह सापडले असल्याने औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. खेड तालुक्यात आळंदी,चाकण,नाणेकवाडी आणि कडूस येथे प्रत्येकी एक व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्याने तालुक्यातील बाधित रुग्णाची संख्या ४३ वर गेली असल्याची माहिती सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी दिली.


चाकण येथील औद्योगिक वसाहती मधील कंपनीत काम करणाऱ्या सात कामगारांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे संपूर्ण एमआयडीसी हादरली आहे. गेली काही दिवसांपासून चाकण एमआयडीसीतील कंपन्या सुरु झाल्या आहेत.

आतापर्यंत चाकण मधील कंपनीत काम करणाऱ्या ९ कामगारांना करोनाची लागण झाली आहे.
त्यामुळे संपूर्ण एमआयडीसीतील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कंपन्यामध्ये काम करणारे कामगार पिंपरी चिंचवड, पुणे येथून ये जा करीत आहेत. रेड झोन मधून आलेल्या कामगारांना करोना होत असल्याने औदयोगिक वसाहती मध्ये काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती कामगार व्यक्त करीत आहेत.

कंपनीतील कामगार कंपनीत राहून काम करीत होते असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात त्यांनी पुणे पिंपरी चिंचवड येथे ये जा केली होती. त्यामुळे लागण झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

कंपनीत काम करणारे सात पैकी एक कामगार कडूस येथील असल्याने त्याची नोंद खेड तालुक्यात केली असून उर्वरित सहा करोना पॉझिटिव्ह कामगारांची नोंदणी पिंपरी चिंचवड पुणे येथे करण्यात आली आहे.

चाकण परिसरात देशी विदेशी अनेक कंपन्या आहेत या कंपन्या आता सुरु झाल्याने कामगारांची मोठी वर्दळ सुरु झाली आहे अनेक कंपन्यामध्ये कामगारांची संख्या मोठी आहे तर त्यात काम करणारे अनेक कामगार कर्मचारी रेड झोन मध्ये राहणारे आहेत. त्यांच्याकडून नकळत सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्याने करोना विषाणूच्या संक्रमणाची भीती कामगारांमध्ये पसरत आहे. दिवसेंदिवस चाकण एमआयडीसी मध्ये करोना बाधित कामगारांची संख्या वाढत चालली असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे.जागतिक हब असलेल्या चाकण एमआयडीसी ला करोनाचे ग्रहण लागले आहे. कंपनी मालकानी जबाबदारीने कामगारांची काळजी घेणे आता आवश्यक बनले आहे.

दरम्यान खेड तालुक्यात कारोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढू लागली आहे आतापर्यंत ती ४३ वर पोहचली आहे. तालुक्यातील चाकण परिसरातील अनेक ठिकाणच्या व कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची करोना पॉझिटिव्ह नोदंणी पिंपरी चिंचवड पुणे येथे होत असल्याने केवळ ग्रामीणची आकडेवारी ४३ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत २ व्यक्तींचा करोना मुळे मृत्यू झाला आहे. दवाखान्यात १२ जण उपचार घेत असून ते ठणठणीत आहेत. आतापर्यंत २७ जण बरे होऊन घरी आले आहेत.

तालुक्यातील कडूस येथे एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीची उपायोजना सुरु करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी अजय जोशी, पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी प्रत्येक्ष भेट देऊन नागरिकांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या यापूर्वी कडूस गावात ४ करोना पॉझिटिव्ह व्यक्ती उपचार घेऊन बऱ्या होऊन घरी आल्या आहेत असे असताना एका कंपनीत काम करणारा कामगार पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा कडूस गावात कंटेनमेंट झोन लागू होणार आहे.

Join WhatsApp group for daily updates

Clothing & Apparel:

Jewelry & Watches:

Health & Beauty: