Two Indian officials working with Indian High Commission in Islamabad (Pakistan) are missing: Sources
यापूर्वी करण्यात आला होता अधिकाऱ्यांचा पाठलाग
भारताने ३१ मे रोजी पाकिस्तानी उच्चायोगातील दोन कर्मचाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती. चोरलेल्या दस्तावेजांची देवाणघेवाण करताना पाकिस्तानी उच्चायोगातील तीन कर्मचाऱ्यांना रविवारी अटक करण्यात आली होती. लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही मोठी कारवाई केली होती. अबिद हुसैन, ताहीर खान आणि जावेद हुसैन अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नाव होती. ते थेट आय़एसआयच्या संपर्कात होते. आयएसआय पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दोघांना तात्काळ देश सोडण्याचा आदेश दिला होता. यापूर्वी २०१६ साली पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात पाकिस्तानातील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याचा पाठलाग करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. भारतीय अधिकाऱ्याने बनवलेल्या व्हिडीओमध्ये एक बाईकस्वार त्यांच्या गाडीचा पाठलाग करत असल्याचे दिसत होता. तसेच अहलुवालिया यांच्या घराबाहेर एक कार आणि बाईकस्वार उभा असल्याचं दिसत त्या व्हिडीओत दिसत होतं.










