रॉयटर्स या वृत्त संस्थेने म्हटले आहे, की लडाख सीमेवर दोन्ही देशांदरम्यान अत्यंत तणावाचे वातावरण आहे. सध्या दोन्ही सैन्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. यापूर्वी मंगळवारी सकाळी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले होते, सीमा वादावर दोन्ही देशांत सकारात्मक चर्चा सरू आहे आणि लवकरात लवकर काही मार्ग निघेल. भारतीय लष्कराने जारी केलेल्या एका अधिकृत निवेदनात म्हणण्यात आले आहे, की 'गलवान खोऱ्यात डि-एस्कलेशन प्रक्रियेदरम्यान गेल्या रात्री दोन्ही सैन्य समोरा-समोर आले. यात आपले जवान शहीद झाले. यात एक अधिकारी आणि दोन सैनिकांचा समावेश आहे.
भारतावरच केला आरोप -
एकीकडे भारताला एकतरफा पाऊल उचलू नये, असे आवाहन करणारा चीन दुसरीकडे भारतीय लष्करच या हिंसाचारासाठी जबाबदार असल्याचे म्हणत आहे. चीनने सरकारी माध्यम ग्लोबल टाइम्सच्या माध्यमाने भारतावर सीमा ओलांडून कराराचे उल्लंघण केल्याचा आरोप केला आहे. चीनने आरोप केला आहे, की भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन वेळा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. यानंतर हा हिंसाचार झाला. एवढेच नाही, तर भारताने आपल्या लष्कराला करारानुसार सीमा ओलांडण्यापासून रोखायला हवे. यामुळे अशा प्रकारची चकमक पुन्हा उद्भवणार नाही, असे आवाहनही चीनने केले आहे.
...तर चीनचंच मोठं नुकसान -
भारत आणि चीन यांच्यात यापूर्वी 1967 मध्ये झाडप झाली होती. म्हणजे बरोबर 53 वर्षांपूर्वी. ही चकमक सिक्किममध्ये उडाली होती. भारत आपल्या हद्दीत 1962 च्या युद्धानंतर सैन्यासाठी तयारी करत होता. यामुळे चीन चिडला होता. 1967च्या या छोट्या युद्धामध्ये भारताचे 80 जवान शहीद झाले होते तर चीनचे 400 सैनिक ठार झाले होते.









