Welcome to Souq Ecommerce Store !
India China Face Off: चीनच्या हल्ल्यात २० जवान शहीद; भारताचंही जशास तसं उत्तर


चीनचे ४३ सैनिक ठार झाल्याची शक्यता
India China Face Off: चीनच्या हल्ल्यात २० जवान शहीद; भारताचंही जशास तसं उत्तर

- हरिश गुप्ता, सुरेश एस. डुग्गर 

जम्मू/नवी दिल्ली : भारतीय सीमेवरील गवलान खोऱ्यात चिनी सैनिकांनी सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात भारताच्या एका कर्नलसह तीन जवान शहीद झाले. याच हल्ल्यात भारताचे आणखी १७ जवान जखमी झाले होते. परंतु त्या परिसरात शून्याखाली असलेल्या तापमानामुळे ते वाचू न शकल्याने शहीदांची संख्या २० झाली. काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारताने या कारवाईला जशास तसे उत्तर देत चीनचे ४३ सैनिक मारल्याचा दावाही केला आहे.
हा तणाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि सैन्यप्रमुखांची दोनवेळा चर्चा केली.

संघर्षाला चीन कारणीभूत; परराष्ट्र खात्याचा दावा
भारतीय लष्कराने म्हटले आहे की, गवलान खोºयातील पॅट्रोलिंग पॉर्इंट १४ पाशी सैन्य माघारीची सुरू असताना दोन्हीकडील सैनिकांत हा संघर्ष झाला. त्यात दोन्ही बाजूचे जवान मृत वा जखमी झाले. मात्र लष्कराने भारताचे किती जवान शहीद झाले, हे स्पष्ट केलेले नाही. दोन देशांच्या सीमेवरील जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न चीनने केल्यामुळे दोन्ही बाजूंच्या सैन्यांमध्ये संघर्ष झाला, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले. मात्र भारतीय लष्कर वा
परराष्ट्र मंत्रालयाने आपले एकूण २० जवान शहीद झाल्याचे मान्य केले आहे. सीमेवर चीनच्या या कागाळीमुळे देशभर संतापाचे वातावरण आहे.

४५ वर्षांनी पुन्हा रक्तरंजित संघर्ष
भारत व चीनच्या सैनिकांमध्ये सोमवारी झालेली हाणामारी हा पूर्व सीमेवर दोन्ही देशांमध्ये ४५ वर्षांनी झालेला रक्तरंजित संघर्ष होता. याआधी अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर गस्त घालणाºया आसाम रायफल्सच्या गस्ती तुकडीवर चिनी सैनिकांनी गनिमी काव्याने केलेल्या हल्ल्यात भारताचे चार जवान शहीद झाले होते.

53 वर्षांपूर्वी सन १९६७ मध्ये सिक्किम तिबेट सीमेवर नाथू ला खिंड व चो ला येथे दोन्ही सैन्यांमध्ये झालेली चक्क तुंबळ लढाई झाली होती.
88 भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. पण त्याच्या बदल्यात ३४० चिनी सैनिकांचा खात्मा केला होता.
दोन्ही देशांचे मिळून सुमारे एक हजार जवान जखमीही झाले होते.
1962च्या युद्धानंतरचा भारत व चीन यांच्यातील तो सर्वात भीषण संघर्ष होता.

भारतीय सैनिकांनीच हल्ला केल्याचा चीनचा कांगावा
भारतीय सैनिकांनी चिथावणी देऊन हल्ला केल्यामुळेच हे घडल्याचा कांगावा चीनने केला आहे. चीनचे प्रवक्त म्हणाले की, वरिष्ठ पातळीवर बैठक होऊन सीमेवरील तणाव कमी करण्यावर सहमती झाली होती. मात्र १५ जून रोजी भारतीय सैन्याने बेकायदा कृत्यांसाठी दोन वेळा सीमेचे उल्लंघन केले.
चीनचा हा कांगावा अजिबात न पटणारा आहे. एकीकडे चीनमुळे जगभर कोरोनाचे विषाणू पसरले असताना, आता त्यावरून जगाचे लक्ष उडावे, यासाठीच चीनने या कागाळ्या सुरू केल्या आहेत.
चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी भारतात होत असतानाच नेमके चीनने हे केले आहे.




                     Join whatsapp group for daily updates

                                           click here

Clothing & Apparel:

Jewelry & Watches:

Health & Beauty: