Majha maharashtra news14 Jun. 2020 12:19
मुंबई : बॉलिवूडमधील एक चांगला म्हणून ओळख असलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput suicide) याने आत्महत्या केली आहे. वांद्र्यातील घरी गळफास घेऊन त्यांनं आत्महत्या केल्याची माहिती आहे. सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती मिळाली आहे.
सुशांत सिंह राजपूतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी झाला होता. सुरुवातीला मालिकांमधून आपल्या सुरूवात करणाऱ्या सुशांतने 2013 सालच्या काय पोछे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सुशांतने काही निवडक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या.
त्याच्या कारकिर्दीला खरा ब्रेक मिळाला तो धोनीवर केलेल्या बायोपिकमधील भूमिकेनंतर. त्यांनं एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी मध्ये महेंद्रसिंह धोनीची भूमिका केली होती.
सोबतच शुद्ध देसी रोमान्स, पी.के., डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी अशा सिनेमांमध्ये त्याने लक्षवेधी भूमिका निभावल्या होत्या.
अभिनय क्षेत्रात त्यानं किस देश में है मेरा दिल या मालिकेद्वारे पदार्पण केले होते. तर पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे तो घराघरात पोहोचला होता.
Join WhatsApp group for daily updates