आधी स्वतःचे फक्त जीवन संपवून नाही तर ही अद्वितीय सृष्टी ,स्वर्गालाही लाजवणार निसर्ग, देवापेक्षा हि श्रेष्ठ असे आई -वडिलांचे प्रेम सोडून जाणे कितपत योग्य आहे.
कितीही पैसे दिले तरी हा जन्म पुन्हा नाही.
एखादया प्राण्याने आत्महत्या केली असं आजून तर घडले नाही.ते सुद्धा स्वतःच आयुष्य आनंदाने आणि आलेल्या कठीण वेळेत समाधानी राहून जगतात.
मग ही वेळ पृथ्वीवरील सर्वात हुशार अन आपल्या जोगे स्वरूप विश्व निर्माण करणारी मानव-जात त्याच्यावरच का येते?
कारण स्पर्धेच्या युगात माणूस आपले अस्तित्व विसरून गेला आहे.तो माझ्या पुढे गेला, मग मीच का मागे?सर्व हुशार, मग मीच का 'ढं'? सर्व श्रीमंत, मग मीच का गरीब?मीच का कर्जबाजारी?का मीच हरतो सतत?माझ्याच वाट्याला का दुःख?मी कधी होणार त्याच्या एवढा श्रीमंत?आणि त्याच्या सारख मी कधी जगणार आयशो-आरामात?
याच विचारात जगणे आणि सतत स्वतःची दुसऱ्याबरोबर केलेली तुलना आणि त्यातून आलेले नैराश्य हेच मूळ कारण आहे स्वतःला संपवून घेण्याचं.
कशासाठी आपण आपले जीवन आणि आपले नशिब तोलत राहतो दुसऱ्याशी ?
त्याच्या पुढे जाण्यासाठी कि अपयश आल्यास आत्महत्या करून सर्वांच्या पुढे जाण्यासाठी.
स्वतःतील अहंकार ,प्रामाणिक पणा, अन स्वतःतील चुकांची स्वतःशी तुलना करा.मान अपमान सोडून स्वतःच्या कुवती प्रमाणेच कष्ट ,प्रयत्न व निर्णय घ्या.कारण आपण आहोत तरच सर्व आहेत.आपल्यापेक्षा काहीच मोठे नाही या जगात.
आणि शेवटी सरते सांगायचे झाल्यास,अपयश,हार,जीत हे जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. ते जीवनात येणारच.
नाही तर बिना संकटांचे आळणी आयुष्य जगण्यात काय मजा...!☺️☺️